पाहा Video : गुरुला अशी ओळखून आहे राधिका

By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता राधिका आणि शनाया एकत्र मिळून गुरुचा खरा चेहरा समोर आणत आहेत. त्यातच राधिका अजूनही गुरुला किती चांगलं ओळखते हे देखील पाहायला मिळतय.

नुकत्याच सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या प्रोमोमध्ये पुन्हा एकदा गुरुचा मूर्खपणा पाहायला मिळतोय. एकीकडे राधिका शनायाला गुरुविषयी सांगत असते. गुरुनाथ मायाविषयी काय बोलेल हे राधिकाला आधीच माहिती झालं आहे. ती गुरुची फक्त मैत्रीण असल्याचं तो सांगेल. तेवढ्यात तिथे गुरु येतो आणि राधिकाने म्हटल्याप्रमाणेच म्हणतो. आणि सगळे गुरुवर हसू लागतात. राधिका आणि शनाया मिळून या गोष्टीची चांगलीच मजा लुटतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गुरुला राधिका चांगलीच ओळखून आहे. #MajhyaNavaryachiBayko #ZeeMarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

तेव्हा आता गुरु या सगळ्यात पुढे काय करेल ? मायालाही असाच जाळ्यात अडकवेल का हे या मालिकेतील पुढील भागात पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share