'सुख म्हणजे नक्की काय असतं !'मध्ये नवं वळण, जयदीप बांधणार गौरीसोबत लग्नगाठ

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं !' मालिकेत गौरीच्या लग्नाची सध्या धामधूम पाहायला मिळतेय.  गौरी आणि जयदीप अगदी बालपणापासूनचे मित्र. त्यामुळे या लाडक्या मैत्रीणीचं लग्न लावून देण्याची जबाबदारी जयदीपने स्वत:च्या खांद्यावर घेतली. जयदीपवर जीवापाड प्रेम करणाऱ्या गौरीने जयदीपच्या सांगणयावरुन मनाविरुद्ध जाऊन अनिल सोबत लग्नाला होकार दिला. ज्योतिकासोबत जयदीपचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी गौरीने एवढा मोठा त्याग करण्याचं ठरवलं. मात्र आता जयदीपनेच गौरीचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याने गौरीच्या आयुष्यात नवं वळण आलं आहे.


जयदीपला गौरीचा होणारा नवरा अनिल आणि त्याच्या माणसांनी बांधून ठेवलं होतं. जयदीप कसाबसा सुटत ऐन लग्नाच्या वेळेत घरी पोहचला आणि त्याने अनिलच्या सर्व कारनाम्यांचा पाढा सर्वांसमोर आणला. सोबतच पुरावा म्हणून अनिलची प्रेयसीसुध्दा तो घेऊन आला. अनिलने कंपनीत केलेल् घोळ ऐकून दादासाहेब त कोसळलेच. यासोबतच गौरीसोबत असं काही घडतंय म्हणून माईंनासुध्दा धक्का बसला. 

 

 

 

गौरीचं लग्न मोडल्याने आणि तिच्यामुळेच हा सर्व बाका प्रसंग उद्भवल्यामुळे तिलाच दोष दिला जातोय. पण जयदीपने ह्यावेळी सर्वांना आश्चर्चकित करणारं पाऊल उचलंत गौरीचं मन जिंकलंय. त्याने गौरीसोबत लग्न करण्याचा निर्णय तडकाफडकी घेत तिला शिर्के-पाटलांच्या घराण्याची सून करुन घेतलंय. इतक्यात जयदीपची प्रेयसी ज्योतिकाचीही लग्नमंडपात एन्ट्री होतेय. आता नेमकं काय घडणार, ज्योतिका व सर्व कुटुंबिंय कसे रिएक्ट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Recommended

Loading...
Share