बांधली गेलीये अभि आणि लतीची गाठ, पण संसार होणार का सुखाचा ?

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत आता एक खास वळण आलं आहे. सज्जनराव आणि त्याच्या वडिलांनी लतिकाशी ठरलेलं लग्न भरल्या मांडवामध्ये मोडलं आहे. सज्जनरावांशी बापूंच्या मनासाठी लग्नाला तयार झालेली लतिका आता आणखी एका तडजोडीसाठी तयार झाली आहे. 

 

 

सज्जनरावांशी ठरलेलं लग्न मोडल्यानंतर बापूंचा मान राखण्यासाठी ती अभिसोबत लग्नाला तयार झाली आहे. अनिच्छेने का होईना तिने अभिच्या गळ्यात माळ घातली आहे. खरं तर सुपरफिट अभि आणि वजनदार लतिका ही जोडी काहीशी विजोड वाटत असली तरी आता दोघांची गाठ बांधली गेलीये. त्यामुळे हे दोघं एकमेकांना पती पत्नीच्या रुपात स्विकारतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share