कुलकर्ण्यांच्या घरी झोकात साजरा होणार दसरा

By  
on  

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत.नवरात्री नंतर वेध लागतात ते ‘दसरा आणि दिवाळीचे’, ह्यात आपल्या मालिका कश्या मागे राहतील, असंच दसरा सेलिब्रेशन अग्गबाई सासूबाई मालिकेत देखील पाहायला मिळणार आहे. 

 

सगळे हेवेदावे विसरून आणि येणार काळ मंगलमय असू दे असं म्हणत हि मंडळी ‘दसरा’ साजरा करताना दिसणार आहेत, दसऱ्यानिमित्त असावरीने अभिजित राजेंसाठी स्वतः एक जॅकेट शिवला आहे. येणाऱ्या २४ ऑक्टोबर च्या भागात ‘अभिजित – आसावरी’, ‘सोहम आणि शुभ्रा’ हे दसऱ्याच्या आनंदात रंगताना आपल्याला दिसतील. तेव्हा पाहायला विसरू नका हा दसरा विशेष भाग.

Recommended

Loading...
Share