Video: शेफ पराग कान्हेरे आणि सोनाली खरे घेऊन येत आहेत 'आज काय स्पेशल'

By  
on  

अनेक नानाविविध पाककृती करायला व त्या जाणून घ्यायला समस्त महिला वर्गाला आणि खवय्यांना प्रचंड आवडतं. जिभेचे चोचले प्रत्येकालाच पुरवायचे असतात. रोज घरी आपण आईला किंवा बायकोला-बहिणीला किंवा कधी कधी स्वत:लाच विचारतो आज काय स्पेशल बनवायचं बरं . कारण आज काय स्पेशल विचारल्यावर त्या दिवसाचा खास बेत आपल्याला समजतो. म्हणूनच एक नवा कोरा कुकींग शो 'आज काय  स्पेशल' लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. 

 

 

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घेऊया चविष्ट पदार्थांचा Feel, आणि रंगवूया खुमासदार गप्पांची मैफिल असं म्हणत 'आज काय स्पेशल' हा कार्यक्रम आपल्या भेटीला येतोय. सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली खरे ह्या कुकींग स्पेशल शोचं बहारदार सूत्रसंचालन करणार आहे, तर बिग बॉस फेम प्रसिध्द शेफ पराग कान्हेरे विविध रेसीपीज प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. 

 

 

 

समस्त खवय्यांना ह्या नव्या कुकींग शोची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 

 

Recommended

Loading...
Share