‘चला हवा येऊ  द्या’ च्या विनोदवीरांचा असा धम्माल व्हिडीओ तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल

By  
on  

‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान  निर्माण केली आहे. आजवर अनेक एपिसोडमधून  सातत्याने ते  प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन  करतायत. ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रत्येच भागाची रसिकांना आतुरता असते.  सागर कारंडे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे विनोदवीर कोणत्या रुपात दिसणार याची कायमच उत्सुकचा असते. त्यांच्यासोबतच स्नेहल शिदम, योगेश सोमण,  अंकुर वाढवे हे कलाकार विनोदांचा जबरदस्त तडका लावतात. त्यामुळे हा कार्यक्रम आणखी खुलतो. 

दरवेळेस थुकरटवाडीच्या मंचावर आपण फक्त या विनोदवीरांचा धम्माल विनोद पाहतो, पण या व्हिडीओत तुम्हाला त्यांचा फावल्या वेळेतला हा जबरदस्त धिंगाणा पाहायला मिळेल. कुशल बद्रिकेने हा धम्माल व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय,स्नेहल शिदम  च्या कल्पनेतून साकारलेला timepass. 

 

 

ह्या नागीण डान्सवर थिरकताना सर्वच विनोदवीर बेधुंद होऊन नाचतायत. तसंच त्यांचे कॅप्टन ऑफ द शीप म्हणजेच दिग्दर्शक-सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेसुध्दा ह्या अफलातून डान्समध्ये  सामिल झाले आहेत. 
 

Recommended

Loading...
Share