By  
on  

प्रेमळ पती की आणखी काही ? समोर आला ‘चंद्र आहे साक्षीला’ चा नवा प्रोमो

अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा ‘तुला पाहते रे’ नंतर छोट्या पडद्यावर गारुड करण्यास सज्ज झाला आहे. सुबोध ‘चंद्र आहे साक्षीला' या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.  यामध्ये सुबोधसोबत ऋतुजा बागवेही दिसते आहे. नवीन लग्न झालेलं हे जोडपं नुकतंच घरी येतं.

 

 

पण भांड्यावर नाव वाचून मात्र नवी नवरी साशंकित होते. पण नायक श्रीधर काळे तिला समजावून वेळ मारून नेतो.  आता यामागे काय रहस्य आहे हे मात्र मालिका पाहिल्यावरच कळेल. पण प्रोमोपाहून सुबोध पुन्हा एकदा ग्रे शेडमध्ये दिसणार की काय अशी शंका चाहत्यांना वाटल्याशिवाय राहणार नाही. ही मालिका 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive