By  
on  

पाहा Video : शनाया बनली स्वॅगची राणी बिंदुराणी

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत आता राधिका आणि सौमित्र शनायाच्या बाजुने दिसत आहेत. शनायाच्या नव्या जॉबच्या पहिल्या दिवशीही त्यांनी शनायाचा कॉन्फिडन्स वाढवलेला दिसतोय. मात्र आता शनाया बनली आहे रेडिओ जॉकी. 

शनाया आता स्वॅगची राणी बिंदुराणी बनून तिच्या जॉबची मजा लुटताना दिसतेय. त्यातच शनायाचं बिंदुराणी गाणंही आता गाजतय. नुकतच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलय. "पागल थोडी दिवानी स्वॅगची राणी.... बिंदुराणी" असे हे गाणं आहे.

 

एकिकडे गुरुनाथ आता एकटा पडलाय. तर दुसरीकडे राधिकाच्या बाजुनेच सगळे आले आहेत. गुरुला धडा शिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करुन झाल्यात. यातच आता राधिका शनायासाठी बऱ्याच गोष्टी करु पाहतेय. त्यात शनायाला नवा जॉब मिळाल्याने सगळेच आनंदी आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive