By  
on  

ही मराठी अभिनेत्री करतेय छोट्या पडद्यावर 'जिगरबाज' पदार्पण

'जिगरबाज' ही नवी मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय.  सत्ता विरुद्ध सत्य असा संघर्ष या मालिकेत पाहायला मिळेल. मालिकेत प्रतीक्षा लोणकर, अरुण नलावडे असे दिग्गज कलाकारही असणार आहेत याबरोबरच एक ओळखीचा आणि ग्लॅमरस चेहराही  या मालिकेत झळकणार आहे. तो म्हणजे पल्लवी पाटीलचा. अभिनेत्री पल्लवी पाटील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. 

पल्लवीला प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं आहे 'जिगरबाज' ही पल्लवीची पहिलीच मालिका आहे. डॉ. सुहानी गायकवाड  ही व्यक्तिरेखा पल्लवी या मालिकेत साकारणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांसोबतच नव्या कलाकारांच्या जोडीने ही मालिका कशी फुलणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

सोनी मराठी वाहिनीवर ११ नोव्हेंबर पासून नवीन मालिका 'जिगरबाज' रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive