By  
on  

एकाचा अपशकुन कसा असणार दुस-याचा शुभशकुन, पाहा ‘चंद्र आहे साक्षीला’चा नवा प्रोमो

सुबोध भावे आणि ऋतुजा बागवेच्या ‘चंद्र आहे साक्षीला’ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. साधी सरळ स्वाती तर मनात एक आणि ओठात एक असलेला श्रीधर. जो स्वातीवर खुप प्रेम करतोय असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याच्या मनात भलतंच काहीतरी सुरु आहे. 

 

 

या मालिका नवा कोरा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये श्रीधरच्या हातून आरसा पडून फुटतो. यावेळी कोणता अपशकुन झाला हे स्वाती म्हणजेच सुमनच्या मनात येऊन जातं. पण हीच घटना श्रीधरच्या कुटिल मनासाठी शुभशकुनाचा संकेत देते. काय सुरु असेल श्रीधरच्या मनात? स्वाती त्याच्या जाळ्यात कशाप्रकारे अडकेल हे समजण्यासाठी मात्र मालिका पाहावी लागेल. ही मालिका 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive