By  
on  

फिल्म सिटीमध्ये उभारलाय 'जिगरबाज' डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा सेट

 डॉक्टर्स म्हणजे देवमाणसं... त्यांना क्षणोक्षणी सलाम करावा असं त्यांचं कार्य.‘डॉक्टर जणू देवाचं दुसरं रूपचअसं अनेकांनी कित्येक वेळा म्हटलंयपण यंदाच्या वर्षी ते अक्षरशअनुभवलं आहे२०२० मध्ये डॉक्टरांनी जी कमालीची सेवा केलीत्यांचं कौतुक शब्दांत मांडावं तितकं कमीच. ‘डॉक्टर हे आजचे सुपरहिरोज आहेत’ आणि हे प्रेक्षकांसह सोनी मराठी वाहिनीनंही अभिमानानं सांगितलं आहेडॉक्टरकी करायलालोकांची सेवा करायला जिगर लागते आणि असेच काही जिगरबाज डॉक्टर्स सोनी मराठीच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आले आहेत.

 

एका हॉस्पिटलची संघर्षगाथा मांडणारी ‘जिगरबाज’ ही मालिका  प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहेसत्तेच्या तुफानाला सत्याचं आव्हान देणार्या जिगरबाज डॉक्टरांची ही गोष्ट आहेडॉअमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत अरुण नलावडेपल्लवी पाटीलअमृता पवारश्रेयस राजेविजय पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेतजगदंब क्रिएशन्सनं यापूर्वी ऐतिहासिक मालिकांची निर्मिती केली आहेपण या नव्या मालिकेच्या निमित्तानी त्यांनी एक वेगळी गोष्टवेगळा जॉनर निवडला आहेविशेष म्हणजे डॉअमोल कोल्हे हे स्वतडॉक्टर आहेत त्यामुळे डॉक्टरांच्या जीवनावर आधारित गोष्ट मांडण्याची त्यांची कल्पना खरंच छान आहे.

 

 

कथादिग्दर्शनअभिनय यांसह या मालिकेची जमेची बाजू म्हणजे मालिकेचा सेट. ‘लोक-आधार रुग्णालय’ नावाचं हॉस्पिटल या मालिकेत दाखवण्यात आलं आहे आणि हॉस्पिटलचा पूर्ण सेट हा फिल्म सिटीमध्ये उभारला आहेहा सेट उभारण्यामागे कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी आणि प्रतीक रेडीज यांची मेहनत आहेअप्रतिम सेट तयार करूनचित्रीकरणाला खरंखुरं रूप देण्यासाठी जिगर लागते आणि ते दोघंही जिगरबाज आहेतअसं म्हटलं तरी हरकत नाही.

 

तुम्हीही अनुभवा जिगरबाज डॉक्टरांची गोष्ट ‘जिगरबाज’ मालिकेतसोमवार ते शनिवार रात्री  १० वाजताफक्त सोनी मराठीवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive