By  
on  

पाहा Photos : 'वैजू नंबर 1'च्या सेटवर अशी साजरी झाली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने अनेक मालिकांच्या सेटवरच दिवाली सेलिब्रेशन करण्यात आलं. तर काही मालिकांनी दिवाळीच्या आधी चित्रीकरण करून दिवाळी कलाकारांना सुट्टी मिळल्याने कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. 'वैजू नंबर 1' मालिकेच्या सेटवरही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला.

या मालिकेत तिसरी मंजिल या कॉलनीचे रहिवासी म्हणजेच या मालिकेतील कलाकार मिळून सेटवरच दिवाळीचा आनंद लुटला. यावेळी पारंपारिक वेशभुषेत असलेल्या या कलाकारांनी एकत्र फोटो क्लिक करून आनंद साजरा केला.

सध्या या मालिकेत विविध वळण पाहायला मिळत आहे. त्यातच मालिकेतील वैजू म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मिडीयावर चर्चेत असते. सोनालीचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

Recommended

PeepingMoon Exclusive