By  
on  

पाहा Photos : अभिजीत-आसावरीने असा एकत्र साजरा केला त्यांचा वाढदिवस

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत आता सेलिब्रेशन पाहायला मिळतय. हे सेलिब्रेशन आहे आसावरी आणि अभिजीत यांच्या वाढदिवसाचं. या दोघांच्या आयुष्यात एक योगायेग घडत आहे. कारण दोघांचाही वाढदिवस हा एकाच दिवशी आहे.

याच वाढदिवसासाठी अभिजीतने आसावरीसाठी खास सरप्राईज प्लॅन केलं आहे. ज्या चाळीत ते आता राहत आहे तेथील लोकांना बोलावून हीच आपली फॅमिली असल्याचं सांगत त्यांनी या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी चाळीला सजवून खास सेलिब्रेशन करण्यात आलं. आणि मग अभिजीत आणि आसावरी त्यांच्या या नव्या परिवारासोबत मिळून केक कापतात. 

अभिजीत आणि आसावरी या दोघांमधला दुवा ठरली आहे ती म्हणजे शुभ्रा. सोहमच्या वागण्याने  या कुटुंबाला प्रचंड त्रास झाला. मात्र आसावरीच्या प्रेमासाठी आणि अभिजीत सगळी प्रॉपर्टी सोहमच्या नावाने करतो आणि दोघे एका चाळीत रहायला जातात. या दोघांनीही त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. एकीकडे अभिजीतने सुरु केलेल्या त्याच्या नव्या पावभाजीच्या गाडीचीदेखील चर्चा होत आहे. त्यामुळे सोहमचा मात्र जळफळाट होत आहे. 


मात्र आता असं असतानाही अभिजीत आणि आसावरी या चाळीत सुखात आहेत. मात्र आता तरी सोहमचे डोळे उघडतील का ? आसावरीचा लाडका बबड्याला त्याची चूक कळेल का पुढील भागांमध्येच समोर येईल.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive