By  
on  

पाहा Photos : असा आहे 'सांग तू आहेस का ? मालिकेतील स्वराज

गेल्या काही दिवासांपासून एका नव्या मालिकेच्या प्रोमोची चर्चा आहे.  'सांग तू आहेस का ?' या आगामी मालिकेचा प्रोमा आणि त्या प्रोमोत वाजणार त्याचं टायटल साँग प्रेक्षकांना आवडतय. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, सानिया चौधरी आणि शिवानी रांगोळे हे कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार सिद्धार्थ हा स्वराज नावाची व्यक्तिरेखा या मालिकेत साकारत आहे. जो एक मोठा स्टार आहे.  त्याची पत्नि वैदेही या जगात नाही. मात्र तिचा भास त्याला सदैव जाणवतोय. तर दुसरीकडे शिवानी त्याच्या चाहतीची व्यक्तिरेखा साकारतेय. जी त्याची खूप मोठी फॅन आहे. या सगळ्यात वैदेही आसपास असल्याचा हा भास आहे की ती खरच स्वराजच्या आसपास आहे हे ही मालिका प्रदर्शित झाल्यावर समोर येईलच. 

 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या स्वराजच्या भूमिकेतील लुकचे काही फोटोही आता सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. यातून या स्वराजचा लुक पाहायला मिळतोय. मात्र हा स्वराज कसा आहे हे मालिकेतून समोर येईलच. 

 

या मालिकेचा विषय प्रोमोमधूनच लक्षवेधी ठरतोय. तेव्हा ही मालिका कधी सुरु होतेय याची प्रेक्षक वाट पाहत असणार एवढं नक्की. येत्या 7 डिसेंबरपासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive