By  
on  

‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर घडणार स्वयंवर, कोण कोण होणार यात सहभागी

चला हवा येऊ द्या’ हा शो गेली सहा वर्षं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. घराघरातील तो एक लोकप्रिय शो झाला आहे. या आपल्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. कारण ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर स्वयंवर घडणार आहे.

 

 

थुकरटवाडीमध्ये यावेळी खास पाहुणे आले आहेत. हे सगळे पाहुणे आहेत क्रिकेटच्या मैदानावरचे. रमेश पोवार, धवल कुलकर्णी, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे आणि समीर दिघे हे या मंचावर दिसणार आहेत. 
पण क्रिकेटच्या मैदानातून स्टेजवर आलेल्या पाहुण्यांवर जडला आहे श्रेयाचा जीव. धवल कुलकर्णी, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे या यंग क्रिकेटरपैकी कोण जिंकणार हे मात्र शो पाहिल्यावरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive