By  
on  

पाहा Video: ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवर नांगरणी करतोय हा छोटा शेतकरी

मालिकेच्या सेटवर शुटिंगवरून थोडा जरी वेळ मिळाला की कलाकार त्यांचा वेळ आवडत्या कामात घालवतात. कुणी पुस्तक वाचतं तर कुणी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतं. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकारही अनेकदा त्यांचा वेळ असाच घालवत असतात. पण सध्या या मालिकेतील लाडू मात्र फावल्या वेळात मस्ती करताना दिसतो.

 

लाडूचा एक मजेशीर व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यात तो छोटा नांगर घेऊन जमीन नांगरताना दिसत आहे. या नांगराला एक बैल जोडीही जुंपली आहे. यातील एक बैल आहे बरकत. बरकतने लाडूच्या या नांगराची एक बाजू तोलून धरली आहे. जमिनीतून काही अंतर पुढं गेल्यावर हा छोटा शेतकरी भलताच दमताना दिसत आहे. लाडूचा हा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive