By  
on  

एक तरफ है घरवाली एक तरफ बहारवाली ... काय म्हणता अण्णांनू बरोबर ना !

'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत. अनेक अनपेक्षित घटनांपेक्षा ही मालिका सध्या अण्णा नाईक आणि शेवंताच्या प्रेमप्रकरणावरच जास्त आधारित आहे. ते काहीही असलं तरी प्रेक्षकांना मात्र हेच पाहायला जास्त आवडतंय. एकूणच काय तर बायको असूनही बाहेर प्रेमप्रकरण करण्यात मश्गूल असलेल्या अण्णांच्या रासलीला पाहण्यात प्रेक्षकांना बराच रस आहे, म्हणूनच मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलीय. 

मालिकेत शेवंता साकारुन सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने हा भन्नाट फोटो शेअर केला आहे. यात एकीकडे शेवंता ,मधोमध बंदुक घेऊन अण्णा आणि दुसरीकडे त्यांची बायको असे पाहायला मिळतायत. यावर नेटक-यांनी नुसता कॉमेंटसचा पाऊस पाडला आहे व एकापेक्षा एक सरस कॅप्शन्स दिले आहेत. 

हा फोटो पाहून कोणी म्हणतंय....'एक तरफ है घरवाली एक तरफ बहारवाली' तर कोण म्हणतंय.... 'शेरास सव्वाशेर', 'माझ्या नव-याची बायको'. तुम्हालासुध्दा हा फोटो पाहून नक्कीच हसू येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive