By  
on  

शेवंताने केला गरमा गरम वडापावचा बेत, घरात बसून करतेय कुकिंग 

तुम्ही या क्वारंटाईनमध्ये काय करताय ? या प्रश्नाचं जास्तीत जास्त उत्तर हेच कुकिंग असेल असचं चित्र दिसतय. कारण सध्या सोशल मिडीयावर क्वारंटाईनच्या या काळात बहुतांश लोकं कुकिंग करताना दिसत आहेत. काही घरात बसून आपल्या कुटुंबासोबत एकत्र मिळून कुकिंग करत आहेत. तर काही आईला मदतीसाठी कुकिंग शिकत आहेत. कला विश्वातील कलाकारही याला अपवाद नाहीत. बऱ्याच कलाकारांच्या सोशल मिडीया अकाउंटवर तुम्हाला कुकिंकचे व्हिडीओ किंवा पोटो दिसतील. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Vada pav Stay home and stay safe ! . . #apurvanemlekar #vadapav #quarantineandchill #quarantinelife #stayhome #gocorona

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली अपूर्वा नेमळेकरही घरात बसून कुकिंग करतेय. घरात विविध रेसिपी ती करून पाहतये. नुकतच तिने घरी वाडपावचा बेतही केला आहे. नुकताच तिने वडे तळतानाचा व्हिडीओही शेयर केलाय. शिवाय अपूर्वा सगळ्यांना घरात बसण्याचही आवाहन करत आहे. यावेळी गरमा गरम वडे तळत असतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल यात शंका नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Garam garam vada pav . . #apurvanemlekar #vadapav #quarantinelife #quarantine #cooking

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

बरेच कलाकार घरात बसून त्यांचा छंद जोपासत आहेत. एरवी चित्रीकरणात व्यक्त असलेले हे कलाकार या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करताना दिसत आहेत. 

Recommended

PeepingMoon Exclusive