By  
on  

या मालिकेतून ही अभिनेत्री झाली प्रचंड प्रसिद्ध , असा होता मालिकेचा पहिला दिवस

‘रात्रीस खेळ चाले’ या थरारक मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मालिकेचा थरार आणि मालवणी भाषा यांचा उत्तम मेळ असलेली ही मालिका नंतर दुसरा भागही घेऊन आली. मात्र या दुसऱ्या भागात एक आणखी कलाकार यात झळकली. जिचं या मालिकेत नाव होतं ‘शेवंता’. मालिकेत तिची एन्ट्री होताच तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं. आणि ही शेवंता इतकी प्रसिद्ध झाली की सगळीकडेच शेवंताची चर्चा होऊ लागली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ही भूमिका साकारली आहे. त्यानंतर अण्णा आणि शेवंता ही जोडीही प्रसिद्ध झाली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My first day on the sets of Ratris khel chale 2 ️ . . #apurvanemlekar #shevanta #shevantaswag #shevantalovers #rkc2 #zeemarathi

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

सध्या लॉकडाउनमध्ये अपूर्वाने तिची हीच आठवण शेयर केली आहे. ती तिच्या सेटवरील आठवणी मिस करतेय आणि म्हणूनच तिने  ‘रात्रीस खेळ चाले 2’च्या सेटवरचा पहिला दिवस कसा होता हे पोस्ट केलं आहे. या सेटवरील पहिल्या दिवसाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांचा लाईक्सचा वर्षाव होत आहे. या दिवसानंतर अपूर्वाच्या आयुष्यात सगळच बदललं आहे. त्यामुळे तिच्यसाठी ही आठवण कायम स्पेशल राहील एवढं नक्की.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive