By  
on  

 रिपीट्स बंद आणि आता ओरिजनल होणार सुरु

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम थांबलं आणि चित्रीकरणही बंद झाली. मात्र आता मनोरंजन विश्वाचं काम हळूहळू सुरु होत आहे. विशेष म्हणजे मालिका विश्वाचं काम सुरु झालं आहे. लॉकडाउन दरम्यान मालिकांचे जुने भाग पाहायला मिळत होते आणि जुन्या मालिकांचे प्रसारणही सुरु होते.
 माऊ आता सरकारने दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. येत्या १३ जुलैपासून नव्या भागांसह स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका भेटीला येणार आहेत. मालिकांचे नवे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकेच उत्सुक आहेत हे कलाकार. याविषयी त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे म्हणाली, ‘आमच्या मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा ऑनएअर गेला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आताही आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. दररोज रात्री आठ वाजता ‘रंग माझा वेगळा’ मालिका लवकरच पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे.”

तेव्हा येत्या 13 जुलैपासून स्टार प्रवाहवर वाहिनीवरील मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive