By  
on  

मराठी मनोरंजनाच्या शुभारंभासाठी निघाली लाडूची स्वारी

आज 13 जुलैपासून टेलिव्हीजनवरील मालिकांच्या नव्या भागांचा शुभारंभ होत आहे. यातच झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकाही पुन्हा नव्या भागासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या मालिकांच्या या पुनरागमनासह मराठी मनोरंजन उत्सवाचा शुभांरभ साजरा केला जात आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील लाडूही या शुभारंभासाठी सज्ज झाला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या शुभारंभासाठी लाडूची देखील स्वारी निघाली आहे. वाहिनीने नुकतेच लाडूचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. ज्यात लाडू आचपासून सुरु होणाऱ्या मालिकांच्या शुभारंभासाठी आमंत्रित करतोय.

 

यासह राणादा आणि पाठकबाईदेखील मनोरंजनसाठी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळतय.  लाडूची भूमिका साकारणारा राजवीर हा प्रेक्षकांचा आवडता बालकलाकार आहे. या मालिकेतील त्याची निरागसता आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. तेव्हा नव्या भागात लाडूला पुन्हा पाहण्याचीही उत्सुकता शिगेला आहे.

 

तेव्हा आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive