रमाबाईंच्या जाणत्या पावलाने उजळणार शनिवारवाडा, पाहा कोण आहे नव्या रमाबाई

By  
on  

‘स्वामिनी’ मालिकेचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. लॉकडाऊनंतर  आता मालिका पुन्हा नव्याने सुरु होताना दिसत आहे. पण यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट आहे. मालिकेत आता एंट्री होणार आहे मोठ्या पेशवीण बाईंची. मालिका आता लीप घेऊन रमा आणि माधवरावांचा तरुणपणीचा काळ चाहत्यांना पाहता येणार आहे. चाहत्यांना मात्र मोठी रमा कोण असेल याची उत्सुकता आहे. 

 

 

या मालिकेत मोठी रमा साकारणार आहे रेवती लेले.  रेवती लेले ही कथक नृत्यांगना आहे. याशिवाय मॉडेलिंगही करते. व्हर्च्युअल ऑडिशनद्वारे रेवतीची निवड करण्यात आली. आता रेवतीला मोठ्या रमेच्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share