By  
on  

पाहा Photos : अखेर राणादाचा एन्काऊंटर ? मालिकेला मिळणार रंजक वळण

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील विविध ट्विस्ट नेहमीच चर्चेत राहीले आहेत. मालिकेत चक्क राणादा मरतोय असाही ट्विस्ट आला होता. त्यानंतर राणाचं बदललेलं रुप पाहायला मिळालं होतं. मात्र आता चक्क मालिकेत राणादाचा एन्काउंटर होताना दिसणार आहे. तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे.

स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राणादाने तुरुंगातून पळ काढला होता. आणि मग पुरावे शोधण्यासाठी आणि पोलिसांपासून लपण्यासाठी राणा हिंडत होता. मात्र अंजलीला वाटतं की राणाने शरणागती पतकरावी. कोर्टकचेरीने रितसर याचा तपास होईल. आणि यावरुनच दोघांचा वाद सुरु आहे. मात्र यातच राणा दा एका बेसावधन क्षणी पकडला जातो. मोहिते आणि मामाची युती झाल्याने मोहिते राणाचं गुपचुप एन्काउंटर करण्यासाठी त्याला मामाच्या ताब्यात देतो. आणि राणादाच्या एन्काउंटरचा दिवस ठरतो.

मात्र अंजली राणाच्या शोधात आहे आणि दुसरीकडे राणाच्या एन्काउंटरची तयारी झाली आहे. अखेर मोहितेच्या बंदूकीतून गोळी सुटते, आणि पुढे काय होतं हे आता मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे. 

खरच राणादाचा एन्काउंटर होतो का ? किंवा यात नेमकं काय घडत? आणि मालिकेला कसं वळण मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive