'आई कुठे काय करते'मध्ये नव्या संजनाची एन्ट्री, ही अभिनेत्री साकारतेय संजना

By  
on  

तुमच्या आमच्या घरातल्या वात्सल्यमूर्ती आईची तंतोतंत छबी छोट्या पडद्यावर मांडणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ह्या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं , प्रत्येक भागांची नेहमीच उत्सुकता असते.. आजी-आजोबा, नातवंडं, आई-बाबा असा परिपूर्ण परिवार पाहणं म्हणजे एक सोहळाच ठरतो.

अनिरुध्द आणि अरुंधतीच्या संसाराला गालबोट लावण्यात संजनाचा खुप  मोठा वाटा आहे. संजना अनिरुध्दला मिळवण्यासाठी आता कुठल्याही थराला जायला तयार आहे. अशातच आता कधीही संजना आणि अनिरुध्दचं सत्य सर्वांसमोर आणि अरुंधतीसमोर उघड होणार असतानाच आणि मालिकेतील पुढच्या घटनाक्रमांची उत्सुकता शिगेला पोहचली  असतानाच  आता आणखी एक ट्विस्ट मालिकेत येतोय. तो म्हणजे संजना साकारणारी अभिनेत्री दिपाली पानसरेच्या जागी नव्या संजनाची एन्ट्री. अचानक संजना का बदलली हे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

ही नवी संजना साकारतेय अभिनेत्री रुपाली भोसले. बिग बॉस मराठीमुळे रुपाली बरीच प्रसिध्दी झोतात आली. तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे सर्वचजण तिला यानव्या भूमिकेत पाहायला उत्सुक आहेत. 

 

 

नव्या संजनाच्या येण्याने मालिकेत किती ट्विस्ट एन्ड टर्न्स येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.  

Recommended

Loading...
Share