'माझा होशील ना'तील आदित्य-सई असे सुटले सायकलवर सुस्साट, पाहा व्हिडीओ

By  
on  

सिनेमा-मालिकेचं शूटींग करताना अनेकदा पडद्यामागे कलाकार काय कसरत करतात किंवा नक्की सेटवर तो सीन कसा घडतो ह्याबद्दल सामान्य प्रेक्षक हे नेहमीच अनभिज्ञ असतात. पण आता सोशल मिडीयामुळे कलाकार व प्रेक्षक यांच्यातली दरी खुप कमी  झालीय किंबहूना ती नाहीशीच झालीय. कलाकार नेहमीच पडद्यामागची धम्माल, किस्से, सीन्स हे सोशल मिडीयावर शेअर करतात आणि चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. त्यामुळेच सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातलं हे नवं नातं फुलू लागलं आहे. 

'माझा होशील ना' मालिकेच्या चाहत्यांसाठी पडद्यामागचा एक धम्माल सीन तुमचा आवडता  आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीने शेअर केला आहे. विराजस म्हणतो, कधी कधी खूप acting करावी लागते!... आणि का ते हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कधी कधी खूप acting करावी लागते! Behind the scenes for today’s episode!

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official) on

 

नायक-नायिका सायकल कसे चालवत रस्त्यावरुन फिरतात या सीन्सचं सिनेमांपासून नेहमीच आपल्याला आकर्षण राहिलंय,  पण बिहाईंड द सीन्समध्ये प्रत्यक्षात मालिकेत सायकल चालवतात हे पाहून तुमची हसून हसून पुरेवाट लागेल यात शंका नाही. 

माझा होशील ना मालिकेच्या पुढील भागांची प्रेक्षकांना सतत उत्सुकता असते. 

Recommended

Loading...
Share