By  
on  

माझा होशील ना च्या सेटवर साजरं झालं हटके रक्षाबंधन

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. लॉक डाऊननंतर शूटिंग सुरु होऊन जवळपास २ महिने होत आले, आणि सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेराच्या मागे काम करणारी मंडळी आणि काही कलाकार यांची राहण्याची सोय सेटवर करण्यात आली.

 त्यामुळे हि मंडळी आपापल्या घरी जाऊ शकत नाहीयेत, आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नाहीयेत. आणि त्यात श्रावण महिना म्हटलं कि सणवार सुरु होतात, म्हणून रक्षाबंधनाचं औचित्य साधून आपल्या सर्वांची लाडकी 'सई' म्हणजेच गौतमी देशपांडे ने सेट वरती काम करणारे स्पॉट दादा सदाभाऊ, जे दिवस रात्र सेटवरच्या लोकांची बडदास्त ठेवत असतात.

प्रेमाने जेवू खावू घालतअसतात, एका हाकेला मदतीला तयार असतात, त्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं. कारण कुटुंब जरी सेटपासून दूर असलं तरी सेटवरचं हे नवं कुटुंब जास्त जवळ येत चाललं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive