By  
on  

आस्तादच्या गाण्याला मिळाली सावनीची साथ, पाहणार 'सिंगीग स्टार' होण्याचं स्वप्न

आस्ताद काळे याने अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय पण खूप कमी लोकांना माहित आहे की आस्तादने १७ वर्ष गाण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे पण गेल्या १७ वर्षांपासून तो गाण्यापासून लांब आहे. 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमामुळे त्याला पुन्हा गाणं गाण्याची, गाणं जगण्याची संधी मिळाली आहे.

'आनंदी हे जग सारे' या मालिकेत आस्ताद आनंदीचे बाबा म्हणजेच अनिरुद्धची भूमिका साकारतोय नुकतेच मालिकेचे नवीन सुरू झाले असून मालिकेचं चित्रीकरण करून आस्ताद रियाज देखील करत आहे आणि या कार्यक्रमासाठी सज्ज होत आहे.त्याच्या या सुरेल प्रवासात त्याची साथ देणार आहे सावनी रवींद्र. सावनी ही स्वतः एक प्रख्यात गायिका आहे आणि अनेक गाणी तिने गायली आहेत.

सावनी आणि आस्तादने एकत्र काम केलं नसलं तरीही आस्ताद आणि सावनी हे दोघेही पुण्याचे असून ते फर्ग्युसन कॉलेज मधून पास झाले आहेत आणि एवढंच नाही तर आस्ताद सावनीचा सिनियर सुद्धा होता. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांसाठी म्हणून या दोघांनी एकत्र काम केलं आहे. कॉलेजमध्ये असताना आस्ताद सिनियर तर सावनी ज्युनियर होती पण 'सिंगिंग स्टार' मध्ये मात्र सावनी ही आस्तादची मार्गदर्शक असणार आहे.

 गायिका आणि अभिनेता अशी जोडी 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमातून मराठी मनोरंजन सृष्टीत पहिल्यादांच पाहायला मिळत आहे.आस्ताद आणि सावनीची जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाचा खजिना घेऊन येईल आणि कार्यक्रमातील इतर जोड्या देखील प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहेत.

अनेक वर्षांच्या रियाजाचा आस्तादला या कार्यक्रमात किती फायदा होणार आहे, सावनी आणि आस्तादची जोडी किती सुपरहिट ठरणार आहे  हे २१ ऑगस्टपासून रात्री ९ वा. 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमात पाहायला मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive