By  
on  

या कलाकारासोबत विराजस कुलकर्णी पहिल्यांदाच शेयर करतोय स्क्रिन, या कलाकाराची 'माझा होशील ना'मध्ये नवी एन्ट्री

'माझा होशील ना' ही मालिका एका वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र या मालिकेत आता नवी एन्ट्री पाहायला मिळत आहे. अभिनेता आशय कुलकर्णीची या मालिकेत नवी एन्ट्री झाली आहे. 

आशय या मालिकेत सुयश नावाची भूमिका साकारतोय. विराजसने याआधी आशयसोबत काम केलं आहे. मात्र विराजस हा आशयसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेयर करतोय. विराजसने नुकतीच याविषीयीची एक पोस्ट सोशल मिडीयावर केली आहे. आशय हा विराजसचा चांगला मित्र आहे. आणि दोघं पहिल्यांदाच या मालिकेच्या निमित्ताने एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसत आहेत.

 

या पोस्टमध्ये विराजस लिहीतो की, "माझ्या वेबसिरीजमध्ये , माझ्या जाहिरातीत, शॉर्ट फिल्म, स्टेजवर मी याला डायरेक्ट केलेलं आहे. मात्र आता पहिल्यांदाच आम्ही एकत्र स्क्रिन शेयर करतोय. आता आदी vs सुयश!"

तेव्हा विविध प्रोजेक्टसाठी दोघांनी एकत्र काम केलेलं असलं तरी दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसतील. या मालिकेच्या नव्या ट्रॅक नुसार विराजसची आदीची भूमिका आणि आशयची सुयशची भूमिका आमने -सामने पाहायला मिळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive