By  
on  

बबड्याची चांगली वागणूक पश्चाताप कि नवा खेळ?

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत दरदिवशी नवनवीन ट्वीस्ट येताना दिसत आहे. इतके दिवस बबड्या म्हणजेच सोहमच्या वागण्याला घरातील प्रत्येकजण वैतागला आहे. भोळ्या आसावरीचा पदोपदी फायदा घेण्याची एकही संधी तो सोडताना दिसत नाही. 
पण त्याच्या या वागण्याला कंटाळून आसावरी एकदा त्याला नीट वागण्याची तंबी देते.

 

 

आसावरीचा हा बदलेला अवतार पाहून बबड्याने चांगलाच धसका घेतलेला दिसतो आहे. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये एकदम बबड्याचा बदलेला अंदाज दिसून येतो आहे. सकाळी लवकर उठून देवपुजा करताही दिसतो आहे तसेच शुभ्राची माफी मागताना दिसतो आहे. त्याचा हा अवतार पाहून शुभ्रा आणि आसावरीसह प्रेक्षकही बुचकळ्यात पडले असतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive