By  
on  

ह. म. बने तु. म. बने या लाडक्या कुटुंबाने ओलांडला ५०० भागांचा टप्पा

सामाजिक विषयांवर हलक्या-फुलक्या विनोदी ढंगाने भाष्य करणारं लाडक्या बने कुटुंबांच्या हम बने तुम बने या मालिकेने ५०० भागांचा टप्पा नुकताच ओलांडला आहे. सोनी मराठीच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. बने आज्जी - अप्पांपासून ते पार्थ - रेहापर्यंत सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या खुप लाडक्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तुमच्या आवडत्या ह.म. बने तु.म. बने मालिकेचे 500 भाग आज होताहेत पूर्ण! तुमचा बने कुटुंबातला तुम्हांला सर्वांत जास्त आवडणारा सदस्य कोणता? आम्हांला सांगा कमेंट्समधून। पाहा 'ह.म. बने तु.म. बने' सोम.-शनि. रात्री 10 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. #हमबनेतुमबने #HumBaneTumBane #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #VinuyaAtutNati

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

 'ह.म. बने तु.म. बने' ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत असते. मालिकेतील प्रत्येक भाग हा मनोरंजनासोबतच नकळत एक संदेश देऊन जातो. 'ह.म.बने तु.म.बने'च्या या अस्सलपणा मुळेच ती प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. 

बने कुटुंबीयांना येणारे अनुभव आणि त्यांचe आनंद नक्की पहा, १२  रात्री १०.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive