या दिवशी प्रसारित होणार ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा अखेरचा भाग

By  
on  

लॉकडाऊननंतर ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या भागांमधील रंजकता अधिक वाढली. पण ही रंजकता आता शिखरावर असताना मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  पहिल्या पर्वाच्या भागात शेवंताने आत्महत्या करत असल्याचं माई सांगितलं होतं. त्यानंतरच वाड्यावर विविध गोष्टी घडायला सुरुवात होते. 

 

 

आता या मालिकेच्या प्रीक्वेलमध्ये शेवंताने आत्महत्या केली आहे. आण्णांना अनेकदा तिचे भास होताना दिसत आहेत. याशिवाय वाड्यातील लोकांनाही विविध भास होत आहेत. त्यामुळेच मालिका आता शेवटाकडे आल्याचं समोर येत आहे. येत्या 29 ऑगस्ट्ला या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होईल. त्यामुळे शेवटच्या भागात कोणता नवा सस्पेंस मालिकेत दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share