‘सिंगिंग स्टार’ मध्ये स्वानंदीच्या स्वरांना मिळणार रोहीतची साथ, पाहा व्हिडियो

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवर एका नव्या रिअ‍ॅलिटी शोचा बिगुल वाजला आहे. 'सिंगिंग स्टार'  असं या कार्यक्रमाचं नाव आहे.  या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात अनेक कलाकार या कार्यक्रमात गाताना दिसणार आहेत. त्यापैकी आणखी एक गायक जोडी समोर येताना दिसते आहे. स्वानंदी टिकेकर आणि रोहीत राऊत या शोमध्ये गाताना दिसतील. स्वानंदीला आई आरती टिकेकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता सुरू होणार स्वानंदीची संगीतातली दुनियादारी आणि तिला साथ देतोय रोहित श्याम राऊत. पाहा, 'सिंगिंग स्टार' 21 ऑगस्टपासून, शुक्र.-शनि. रात्री 9 वा. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे . . . फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. #सिंगिंगस्टार #SingingStar #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #VinuyAatutNati

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

 

या स्पर्धेत तिला सोबत करण्यासाठी गायक रोहीत राऊत असणार आहे. ऋता दुर्गुळे या शोचं  सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. बेला शेंडे, प्रशांत दामले आणि सलील कुलकर्णी हे या शोचं परिक्षण करणार आहेत. हा शो 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

Loading...
Share