'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतलं हे लग्नानंतरचं प्रपोज प्रकरण पाहिलंत का?

By  
on  

 सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर  यांच्या सूर्या आणि सरिता या व्यक्तिरेखांनी सजलेली सहकुटुंब सहपरिवार ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. दररोज या मालिकेतील उत्कंठावर्धक कथानक प्रेक्षकांना आकर्षित करतंय. चार भाऊ, त्यांच्या पत्नी आणि आई अशा हसत्या-खेळत्या कुटुंबाला पाहून प्रत्येकाला आपल्या घराचंच प्रतिबिंब यात दिसतंय. 

वैभवच्या प्रेमात असलेल्या अंजलीला नाईलाजास्तव पशासोबत लग्नगाठ बांधावी लागते. मोरेंच्या घरात गृहप्रवेश करुन आलेली अंजलीचं पशासोबत जरी पटत नसलं तरी तिने संपूर्ण घराला आपलंसं केलं आहे. ती सर्वांची मनोभावे सेवा करते, घर सांभाळते. इथे वैभवसोबत लग्न करुन आलेली अवनी मात्र प्रत्येक गोष्टीत मोडता घालण्यात पुढे असते. पण अंजली तेसुध्दा सरिता वहिनींसारखंच सांभाळून घेते. पण नव-यासोबत मात्र तिचं जराही पटत नाही. 

अशातच अंजली जोपर्यंत पशाला माफ करणार नाही, तोपर्यंत सूर्या दादा त्याच्यासोबत बोलणार नाही अशी अट घातली आहे. त्यामुळे अंजीची माफी मिळवण्यासाठी पशा आटोकाट प्रयत्न करतोय. पण त्याला यश काही मिळत नाही. 

 

 

 

 

आता चक्क अंजलीच त्याला माफी द्यायला दुकानात पोहचलीय आणि तिला पाहून माफी मागण्यासाठी बावचळून गेलेल्या पशाची पार धम्माल उडतेय.  पण त्याच्या धडपडीला आता तरी यश मिळणार का आणि लग्नानंतरच्या ह्या प्रपोजमुळे अंजली व पशाचं जुळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share