हेक्टीक शेड्युलमधूनही डॉक्टर डॉनच्या सेटवर सुरु आहे अशी धमाल

By  
on  

डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील  डॉलीबाई आणि देवाची आंबटगोड लव्हस्टोरी अनेकांना आवडत आहे. नेहमीच्या लोकेशनवर शूट होत नसल्याने वेगळ्या ठिकाणच्या शुटिंगच्या पर्यायही या ठिकाणी अवलंबायला लागतो आहे. 

 

 

त्यातच अनेकदा सेटवर डे-नाईट शुटिंगही सुरु असतं. अशा वेळी एक बिहाईंड द सीनचा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये डॉली आणि सचिन डान्स करताना दिसत आहे. त्यावेळी देवदत्तही त्यांना जॉईन करताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये देवदत्त म्हणतो, ‘ डे-नाईट शुटिंग. बिहाईंड द सीन- डॉक्टर सचिन यांची स्टाईल. हेक्टीक पण सुंदर. आनंदी क्षण’. आता या सिरीअलमध्ये लवकरच पावसाळ्यातील व्हॅलेंटाईन साजरा होणार आहे. याची उत्सुकता प्रेक्षकांनाही असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share