Video : अखेर ....ते वळण ...येऊन ठेपलंय ! अरुंधतीला समजणार का संजनाबद्दल?

By  
on  

गौरी, अभिषेक, केदार काका  यांच्यानंतर आता यशलासुध्दा अनिरुध्दच्या संजनासोबतच्या नात्याबद्दल समजलं आहे. मुलांना  आपल्या अफेअरबद्दल कळूनही अनिरुध्द काही संजनाचा नाद सोडायला तयारच नाही. आई अरुंधतीच्या सुखासाठी सर्वचजण प्रयत्न करतायत. तिचा आणि अनिरुध्दच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस हा  पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावून  लग्नसोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची मुलांनी जोरदार तयारी केलीय. पण यात विघ्न आहे ते संजनाचं. तिचं सत्य आता कुठल्याही क्षणी अरुंधतीसमोर येईल अशा पध्दतीचं कथानक  आहे. आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची लाडिका मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. 

कहर म्हणजे लग्नाच्या दिवशीच अरुंधती व देविकाने अनिरुध्द आणि संजनाला रंगेहाथ पकडलंय. अनिरुध्दच्या मिठीत संजनाला पाहून अरुंधती बेशुध्द होऊन कोसळतेय असा सीन या व्हिडीओत पाहायला मिळतोय. आता पुढे काय घडणार याची तमाम प्रेक्षकवर्गाला उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अखेर ....ते वळण ...येऊन ठेपलंय....!

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

हा उत्कंठावर्धक व्हिडीओ आई कुठे काय करते मालिकेत आईची प्रमुख भूमिका साकारणा-या मधुराणी प्रभूलकरनेच शेअर केला आहे. लग्नाच्या निमित्ताने जरी संपूर्ण कुटुंब आनंदात असलं तरी हा आनंद किती टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल, कारण अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी हळूहळू सर्वांनाच कळलं आहे. अरुंधतीसमोरही हे सत्य उघड होणार आहे. त्यामुळे हे सत्य अरुंधती कसं पचवणार? तिच्या आयुष्याला नेमकी कशी कलाटणी मिळणार... यासाठी प्रेक्षकांना या मालिकेच्या पुढील भागांची नक्कीच उत्सुकता राहिल. 

Recommended

Loading...
Share