गुरुनाथ, माया आणि सौमित्र ह्या त्रिकुटाचा हा लय भारी स्वॅग पाहा

By  
on  

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत लॉकडाऊननंतर  नवनवे ट्विस्ट येऊ लागले आहेत आणि रसिकांनासुध्दा ते प्रचंड आवडतायत. तुम्हाला माहितच असेल गुरुनाथ,सौमित्र आणि माया ही पात्र आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचले आहेत. मालिकेत जरी सौमित्र विरुध्द गुरुनाथ आणि माया अशी कटकारस्थानं सुरु असली तरी प्रत्यक्षात मात्र हे तिघंही बिहाईंड द सीन्स प्रचंड धम्माल करताना पाहायला मिळतायत. नुकताच त्यांच्या जबरदस्त स्वॅगचा एक व्हिडीओ गुरुनाथ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने शेअर केला आहे. 

सेटवर तिघंही ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले आणि मग काय धम्माल फोटोसेशन आणि व्हिडीओ तर बनतोच. गुरुनाथने या व्हिडीओला बॅड कंपनी असं कॅप्शनही दिलंय. 

चाहत्यांनी या धम्माल स्वॅगवाल्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

 

माफी मागण्याच्या बहाण्याने गुरुनाथ आणि मायाने पिंकी उर्फ सौमित्रला आपल्या जाळ्यात ओढलं व तोच पिंकी असल्याचं बिंग मिडीयासमोर फोडून त्याची नाचक्की केली. 

आता राधिका आणि सौमित्र गुरुनाथचा या अपमानाचा बदला कसा घेणार हे मालिकेत पाहणं औत्सुक्याचं ठरतंय. 

Recommended

Loading...
Share