अखेर या अंदाजात देवाभाईने डॉलीबाईंशी शेअर केली ‘मन की बात’

By  
on  

देवाभाई इतके दिवस मनात असलेल्या प्रेमाची कबूली देण्यास सज्ज झाला आहे. रखत खडत, अनेक अडचणी पार करत का होईना  देवा आणि डॉलीच्या प्रेम कहाणीला आता सुरुवात झाली आहे. पण दोघांपैकी एकानेही  अजूनपर्यंत प्रेम व्यक्त केलं नाही.  पण आता मात्र देवाने डॉलीबाईंना मनातली गोष्ट सांगायचं ठरवलं आहे. देवाच्या मित्रांनी त्यासाठी खास तयारीही केली आहे.

 

 

डॉलीबाईंना प्रपोज करण्यासाठी देवाने धीर एकवटला आहे. .डॉलीबाई आय लव्ह यू म्हणत त्याने आपल्या प्रेमाचा केलेला इजहारही प्रोमोमध्ये दिसून येत आहे. देवाने डॉलीबाईंसाठी चक्क पावसाळ्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. डॉलीबाईंच्या मनात देवाविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर मात्र प्रेमाचं रुप घेणार का हे मात्र लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share