By  
on  

'माझ्या नव-याची बायको' टीमचं धम्माल सेलिब्रेशन , पाहा Video

‘माझ्या नवऱ्याची बायको’  ही प्रेक्षकांची लाडकी मालिका गेली तीन वर्ष  अखंड सुरु आहे.  ह्या मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम ओसंडून वाहतंय. म्हणूनच या मालिकेच्या टीमने नुकतंच 1200 भागांचा टप्पा ओलांडला. याच आनंदाचं हटके पध्दतीने सेलिब्रेशन करताना मालिकेच्या टीमचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. 'सुखी संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत सुरु झालेला या मालिकेचा प्रवास विविध वळणं घेताना दिसत आहे.  प्रेक्षकांच्या प्रेमापोटी सुरु असलेल्या या मालिकेने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने जवळपास 1200 भागांचा टप्पा पुर्ण केला आहे.

 

गुरुनाथ फेम अभिनेता अभिजीत खांडकेकरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive