By Ms Moon | 10-May-2020

पाहा Video : ‘लव्ह यू जिंदगी’वर या अभिनेत्रींनी असा केला व्हिडीओ

लॉकडाउनमध्ये घरात राहून करण्यासाठी विविध गोष्टी आहेत मग त्यापैकी काय करायचं? तर काही कलाकार मंडळींनी विविध व्हिडीओ करायचं ठरवलं आहे. घरातच राहून विविध व्हिडीओ शूट करून वेगवेगळ्या थिमवर कलाविश्वातील कलाकार.....

Read More

By | 09-Jan-2019

कविता लाड-मेढेकरचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन

कविता लाड मेढेकर ही रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री. कविता लाड मेढेकर म्हणाल्यावर त्यांचं प्रत्येकजण कौतुकच करतो इतकं प्रेम आजवरील आपल्या कामांतून, व्यक्तिमत्वातून त्यांनी मिळवलंय. वैवाहिक संसाराच्या काही वचनबद्धतेमुळे.....

Read More

By | 06-Jan-2019

‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत थुकरटवाडीत येणार ‘नशीबवान’ मंडळी

नेहमीप्रमाणे यावेळीही थुकरटवाडी आणि थुकरटवाडीकर सज्ज झालेत प्रत्येकाला हसवायला. प्रत्येक आठवड्याला थुकरट्वाडीत कोण पाहुणे येणार याची उत्सुकता प्रेक्षकालाही असतेच. यावेळीही थुकरटवाडीत अशीच खास पाहुणेमंडळी येणार आहेत. यावेळी थुकरटवाडीत ‘लव्ह यु जिंदगी’ची.....

Read More

By | 21-Dec-2018

सचिन पिळगावकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा 'लव्ह यु जिंदगी'

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंत दिग्दर्शित 'लव्ह यु जिंदगी' चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून.....

Read More

By | 20-Nov-2018

पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळणार सचिन पिळगावकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण 'लव्ह यु जिंदगी' या मराठी सिनेमाच्या टीझरमध्ये पाहिले.....

Read More

By | 06-Nov-2018

सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे यांच्या 'लव्ह यु जिंदगी'चा उलगडला टिझर

तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणाया अनिरुध्द दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. हा टीझर  प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना 'लव्ह यु जिंदगी' च्या निमित्ताने दिवाळीची एक अदभुत भेट आणि हटके विषयावर  भाष्य करणारा एक प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा टिजर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल. दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस. एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बायगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली असून कथा देखील त्यांनी लिहिली आहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.   https://youtu.be/0CCJj9hM9m8.....

Read More

By | 01-Nov-2018

सचिन पिळगांवकर यांच्यासोबत ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये ही अभिनेत्री झळकणार

प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित.....

Read More