पाहा Video : सोशल मिडीयावर शालिनी वहिनींच्या 'स्लो मोशन मे' डान्सची हवा

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता वेगळं वेळण घेताना पाहायला मिळतेय. गौरी आणि अनीलचं लग्न जयदीपने मोडलं आहे. त्यामुळे शालिनी वहिनींचा प्लॅन फसलेला दिसतोय. अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत शालिनी वहिनी या खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. छोट्या पडद्यावर खलनायिका साकारणारी माधवी ऑफस्क्रिन मात्र सगळ्यांशी मनमिळाऊ आणि मस्ती करताना दिसते.

माधवी सोशल मिडीयावर या मालिकेच्या सेटवरील अनेक बिहाइंड द सिन्स व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. या मालिकेतील सहकलाकारांसोबत ब्रेक टाईममधील मस्ती देखील पाहायला मिळते. नुकताच माधवीने एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. सहकलाकारांसोबत माधवी धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

 

एवढच नाही तर याआधीही शालिनी वहिनींच्या गेटअपमध्ये छल्ला गाण्यावर माधवीने जबरदस्त डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. एकीकडे माधवीच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे सोशल मिडीयावरही माधवीच्या या व्हिडीओची वाह वाह होताना पाहायला मिळतेय.

 

Recommended

Loading...
Share