By  
on  

यहा पें सब शांती शांती है... म्हणत पाठकबाईंनी शेअर केले फोटो

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे पाठकबाई. ही व्यक्तिरेखा साकारत असलेल्या अक्षया देवधरची ही पहिली मालिका आहे . पण या तीन-चार  वर्षांच्या काळात मालिका लोकप्रिय तर ठरतेच आहे, पण याशिवाय राणादा आणि अंजलीबाईंची केमिस्ट्री रसिकांना खुप भावते. 

या मालिकेतील अक्षयाचा साधा आणि सोज्वळ लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षया सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध फोटोशूटमधून तीन चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच अक्षयाने एक ब्लॅक ड्रेसमधलं हटके फोटोशूट शेअर केलं आहे. यात बॅकग्राऊंडला शहराचं पुसटसं चित्र दिसतंय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

या फोटोशूटला अक्षयाने छान साजेशा अशा गाण्यांच्या ओळी दिल्या आहेत.. तुझ्यात जीव रंगला मालिकेचं शूटींग कोल्हापूरमध्ये सुरु असतं आणि तिथेच अक्षयाने हे नवीन फोटोशूट केलं आहे. 

पाठकबाईंच्या ह्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive