By  
on  

सोशल मिडीयावर सरु आजीच्या म्हणीचा धुमाकूळ

एखादं काहीतरी हटके पाहायला किंवा ऐकायला मिळालं तर ते सोशल मिडीयावर व्हायरल होतं. मग एखाद्या मालिकेतील हटके कॅरेक्टर जरी असेल तर त्याचे सोशल मिडीयावर मिम्स बनतात. असेच काही मीम्स सध्या पाहायला मिळत आहेत.

'देवमाणूस' या मालिकेतील सरु आजीचं कॅरेक्टर हे चांगलच भाव खाऊन जातय. आजीला जरी दिसत नसलं तर आजी वाड्याची काळजी घेते. तिचे संवाद तर चांगलेच लोकप्रिय आहेत. पण आता याच सरु आजीच्या म्हणींनी सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पाडलाय. या म्हणी सोशल मिडीयावर आजीच्या फोटोंसकट व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिनेत्री रुक्मिणी सुतार या सरु आजीच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या अभिनयाने त्यांनी नेटकऱ्यांनाही चांगलच वेड लावलय.

 

 देवमाणूस या मालिकेत चांगुलपणाचा मुखवटा घातलेल्या एका वृत्तीवर भाष्य करणारा विषय आहे. ही नवी मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांंचं लक्ष वेधताना दिसतेय. यासह या मालिकेतील विविध भूमिकाही तितक्याच लक्षवेधी ठरत आहेत. या मालिकेतील डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नम्या, मंजुळा या भूमिकाही लक्ष वेधत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive