By  
on  

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील कलाकारांचा हा धडपडता परफॉर्मन्स नक्की पाहा

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका जितकी मनोरंजनात्मक असते तसच मनोरंजन या मालिकेतील कलाकार त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरही करतात. या मालिकेच्या सेटवरी ऑफस्क्रिन मस्ती हे कलाकार सोशल मिडीयावर पोस्ट करतात. हे कलाकार सेटवरील जी काही मस्ती शेयर करतात ते सोशल मिडीयावर व्हायरल होतं.
नुकताच गुरुनाथ म्हणजेच अभिजीत खांडकेकर, रुचिरा जाधव आणि अद्वैत दादरकर यांनी सेटवर एक धमाल स्लो मोशन व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. चाहत्यांनी त्या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली. 

मात्र तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणखी एक व्हिडीओ करण्यात आला. तशाच पद्धतिचा व्हिडीओ शनायाच्या आईसोबत करण्यात आला. मात्र यावेळी ते परफेक्शन न करता या कलाकारांनी विनोदी व्हिडीओ बनवला आहे. धडपडता परफॉर्मन्स म्हणत अभिजीतने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक्सपेक्टेशन्स वर्सेस रिएलिटी अशी विनोदी थिम करण्यात आली. या मालिकेच्या चाहत्यांना हा व्हिडीओही प्रचंड आवडला आहे. काही तासांमध्येच या व्हिडीओला हजारोंनी व्ह्यूज मिळाले आहेत. अभिनेत्री किशोरी आंबिये यांच्या स्वॅग सोबत अभिजीत गुरु आणि अभिजीत खांडेककर या व्हिडीओत दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive