By  
on  

अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव झाला ‘भुताटलेला’, वेब दुनियेत केलं पदार्पण

अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवच्या विनोदी अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. मात्र यंदा रिएलिटी शो किंवा सिनेमातून नाही तर प्रियदर्शन एका वेब सिरीजमधून झळकतोय. ‘भुताटलेला’ असं या वेब सिरीजचं नाव आहे.
प्रियदर्शन जाधव या वेब सिरीमध्ये रायबा नावाची भूमिका साकारत आहे. लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या रायबाच्या आयुष्यात असं काही घडतं ज्याने सगळच बदलतं. सतत दिसणारं अनोळख्या मुलीचं भूत आणि त्याला घाबरणारा रायबा अशी ही हॉरर कॉमेडी आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. 

शिवाजी लोटन पाटील यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. प्रियदर्शन जाधवसोबतच या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री सुरभी हांडे, योगेश सिरसाट, सुनील होळकर आणि सायली पाटील हे कलाकार आहेत. मराठीसोबतच ही सिरीज हिंदीतही पाहायला मिळणार आहे. 
प्रियदर्शनचा हा भुताटलेला कॉमेडी थरार प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही. एमएक्स प्लेयरवर ही वेब सिरीज पाहायला मिळेल.
 

Recommended

PeepingMoon Exclusive