By  
on  

या वेब सिरीजच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात सर्वप्रथम होतेय सुरुवात, वेब सिरीजमध्ये झळकणार अनुपम खेर

राज्यसरकारच्या चित्रीकरणासाठीच्या परवानगी नंतर विविध मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात होत असताना आता चित्रपट आणि वेब सिरीजच्या निर्मात्यांनी कंबर कसली आहे. मनोरंजन विश्वाचं काम पुर्ववत होण्यास सुरुवात होत आहेत.

यातर 'बॉम्बे डे' ही महाराष्ट्रात सर्वप्रथम चित्रीकरण करणारी पहिली हिंदी वेब सिरीज ठरत आहे. नुकताच या वेब सिरीजचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला. यावेळी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या हस्ते एन. डी. स्टुडिओ येथे या वेब सिरीजचा मुहूर्त संपन्न झाला. भरत सुनंदा लिखीत आणि दिग्दर्शित ही वेब सिरीज गुन्हेगारीवर आधारित असून सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मुंबईतला मोठा अंडरवर्ल्ड डॉन आणि त्याचा एनकाउंटर यावर ही वेब सिरीज आधारित आहे. विजय साळसरकर यांनी केलेल्या मुंबईतील या प्रसिद्ध एन्काउंटरवर आधारित ही वेब सिरीज असेल. नुकत्याच झालेल्या मुहूर्तानंतर या वेब सिरीजच्या चित्रीकरणालाही सुरुवात होत आहे.

या वेब सिरीजमध्ये अभिनेता अनुपम खेर, जुही चावला, किशोरी शहाणे, अनिकेत विश्वासराव, इक्बाल खान, शक्ति कपूर, संदीपा धार हे कलाकार झळकणार असल्याचं बोललं जातय.

Recommended

PeepingMoon Exclusive