अभिनेत्री प्रिया मराठे ही मालिका व नाट्यविश्वातली एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या जसे अनेक कलाकार हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकतायत. तसंच प्रियानेसुध्दा नुकतंच ेका हिंदी वेबसिरीजमधून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. कसक असं या हिंदी वेबसिरीजचं नाव असून ती नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे.
हिंदी मालिका विश्वात प्रिया मराठे हे नाव नवं नाही, त्यामुळे कसक या हिंदी वेबसिरीजमधील तिच्या भूमिकेची उत्सुकता ताणली गेलीय. ही वेबसिरीज प्रदर्शित झाली असून त्यातील प्रियाच्या अभिनयाबाबतची समिक्षा तिला कळवावीअसं खुद्द तिनेच आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन सांगितलं आहे.
या वेबसिरीजचं पोस्टर पाहता एकूणच प्रियाची यातील भूमिका दमदार असणार यात शंका नाही. लॉकडाऊन पुर्वी प्रिया अ परफेक्ट मर्डर या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.