By  
on  

अभिषेक बच्चनने जाहीर केला वेब डेब्यु, या सिरीजमधून करणार पदार्पण

आज अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी वेबप्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. अभिषेक बच्चनही याला अपवाद नाही. अभिषेक आता वेबमाध्यमात दिसण्यास सज्ज झाला आहे. Breathe Into The Shadows या सिरीजचं पोस्टर शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. एक वर्षापुर्वी या सिरीजसोबत जोडलं गेल्याचं अभिषेकने सांगितलं. या सिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये माधवन दिसला होता. ट्वीटर हॅंडलवर अभिषेकने रिलीज डेट जाहीर केली आहे.

 

 

 'She lies into the shadows, waiting to be found. Here is the First Look of #BreatheIntoTheShadows. New Series, July 10 on सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर ‘Breathe: Into The Shadows' Abundantia एंटरटेनमेंट द्वारा प्रोड्युस केलं जात आहे. या सिरीजमध्ये अभिषेकसोबत अमित साधही दिसतो आहे. अमित या सिरीजमध्ये कबीर सावंतच्या भूमिकेत दिसत आहे. यासोबतच नित्या मेननही दिसणार आहे. याशिवाय सय्यामी खेरची महत्त्वाची भूमिका आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive