By  
on  

Peepingmoon Exclusive: डिस्ने हॉटस्टारच्या 9 सिनेमांच्या रिलीजची घोषणा वरुण धवन करणार

पीपिंगमूनने तुम्हाला यापुर्वीच एक्सक्लुसिव्ह बातमी दिली होती की डिस्ने हॉटस्टार अनेक बॉलिवूड ए लिस्टर सिनेमांची मेजवानी घेऊन येत आहे. तसेच आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की या मोठ्या रिलीजेसची घोषणा लवकरच केली जाईल. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ही घोषणा खुपच खास असणार आहे.  डिस्ने हॉटस्टारची ही घोषणा 29 जुनला म्हणजेच सोमवारी केली जाणार आहे. यंग सेंसेशन असलेला अभिनेता वरुण धवन हा व्हर्च्युअल इवेंट होस्ट करणार आहे.

या इव्हेंटमध्ये अ‍क्षय कुमार, अजय देवगण, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन आणि संजय दत्त डिस्ने हॉटस्टारच्या इंडिया हेड उदय शंकर यांच्यासोबत सहभागी होतील. जवळपास 9 मोठ्या सिनेमांची घोषणा यात केली जाणार आहे. यामध्ये अक्षयचा लक्ष्मीबाँब, अजयचा भूज: द प्राईड ऑफ इंडिया, महेश भट्ट यांचा सडक 2 आणि अभिषेक बच्चनचा द बिग बुल हे दिसणार आहेत. याशिवाय सुशांत सिंग राजपुतचा ‘दिल बेचारा’ क्रिती सॅनॉनचा मिमि, सनी कौशल आणि राधिका मदानचा शिद्दत, कुणाल खेमूचा लूटकेस आणि विद्युत जामवालचा खुदा हाफिज हे सिनेमे देखील दिसतील. 

लॉकडाऊनमुळे थिएटर अजूनही काही काळ बंद राहण्याची शक्यता आहे. अशा वेळी ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमांना एक नवं क्षितीज आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive