By  
on  

Exclusive: विक्रांत मेस्सी आणि यामी गौतमचा सिनेमा ‘गिन्नी वेड्स सनी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत मेस्सी आणि यामी गौतमचा सिनेमा ‘गिन्नी वेड्स सनी’ आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. मागील वर्षी या सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याच्या थिएटर रिलीजला पुर्ण विराम लागला आहे. त्यामुळे हा ओटीटीवर रिलीज होणार आहे. लग्न न करू इच्छिणा-या महत्त्वाकांक्षी मुलीवर हा सिनेमा बेतला आहे.

पण या मुलीच्या प्रेमात एक मुलगा पडतो. आणि गिन्नीच्या आईच्या मदतीने तिचं मनही जिंकतो अशी या सिनेमाची कथा आहे. या हलक्या फुलक्या सिनेमाला पुनीत खन्ना दिग्दर्शित करत आहेत. विनोद बच्चन या सिनेमाचे निर्माते आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive