By  
on  

Exclusive: भूमी पेडणेकर, कोंकणा सेन शर्माचा, ‘डॉली, किटी और वो चमकते सितारे’ ओटीटीवर होणार रिलीज

बुसानसहित अनेक फिल्म फेस्टीव्हलमध्ये चमकलेला ‘डॉली, किटी और वो चमकते सितारे’ हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकण्यासाठी तयार झाला आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, भूमी पेडणेकर, कोंकणा सेन शर्माचा हा सिनेमा अलंकृता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा मे मध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार होता. पण लॉकडाऊनमुळे हे होऊ शकलं नाही. बालाजी मोशन पिक्चर्सने याला ऑनलाईन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या सिनेमात कोंकणा आणि भूमी दोन बहिणींची व्यक्तिरेखा साकारत आहेत. लहान शहरात राहणा-या या बहिणी आपल्य इच्छा पुर्ण करण्यासाठी काय काय करतात हे दाखवलं आहे. समाजातील रुढी आणि विचारांवर हा सिनेमा प्रकाश टाकतो.  या सिनेमात विक्रांत मैसी, अमोल पराशर आणि करण कुंद्रा यांच्या भूमिका आहेत. भूमी म्हणते, ही व्यक्तिरेखा माझ्या मनाच्या खुप जवळ आहे. 19 व्या वर्षापासून मी जी मेहनत घेत आहे तशाच प्रकारची ही व्यक्तिरेखा आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive